Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनलता मंगेशकर अद्यापही आयसीयूत; प्रकृतीत सुधारणा

लता मंगेशकर अद्यापही आयसीयूत; प्रकृतीत सुधारणा

मुंबई | Mumbai

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असल्याची माहिती लता दीदींच्या अधिकृत ट्विटरवरुन देण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच दिदींच्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करतो आहोत, असे ट्विट लता मंगेशकर यांच्या अकाऊंटवरुन करण्यात आलंय. तसेच कोणीही अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांच्या कुटूंबियांसह डॉक्टरांनीही केले आहे.

लतादीदींना करोनाची लागण झाल्याने ९ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना करोनासोबतच न्यूमोनियाचीही लक्षणे दिसून आली होती. वयोमान आणि इतर शारीरिक व्याधींमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान सन २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना त्या वेळी छातीमध्ये जंतूसंसर्ग झाला होता. त्या वेळी सुमारे २८ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या