लतादीदींची करोनासह न्यूमोनियाशीही झुंज; प्रकृती स्थिर

लतादीदींची करोनासह न्यूमोनियाशीही झुंज; प्रकृती स्थिर

मुंबई | Mumbai

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना करोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकरांना करोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

लतादीदींची करोनासह न्यूमोनियाशीही झुंज; प्रकृती स्थिर
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

मिळालेल्या माहितीनुसार, लतादीदी यांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी आणि त्यांचं पथक लतादीदींवर उपचार करत आहेत. लतादीदींना कोविड न्युमोनिया झाला असून पुढील सात-आठ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावं लागेल, असं डॉ. समदानी यांनी पत्रकारांना सांगितलं.

लतादीदींची करोनासह न्यूमोनियाशीही झुंज; प्रकृती स्थिर
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दरम्यान लता मंगेशकर यांना घरातील कर्मचार्‍याकडून करोनाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांच्या घरात अनेक कर्मचारी आहेत. ते कर्मचारी अनेकदा घराबाहेर काही वस्तू आणण्यासाठी जात असतात. घरातील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर लता दीदींची चाचणी करण्यात आली असून त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com