
कोलकाता (Kolkata)
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. यामुळे लाखो चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
दरम्यान गायक केके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ममता बॅनर्जी पोहोचल्या असून केके यांना तोफांची सलामी देण्यात आली. रवींद्र सदनमध्ये तोफांची सलामी देण्यात आली.