तुम्हाला माहित आहे का? ड्रग्स पार्टीवर कारवाई करणारा NCB चा अधिकारी आहे 'या' मराठी अभिनेत्रीचे पती

तुम्हाला माहित आहे का? ड्रग्स पार्टीवर कारवाई करणारा NCB चा अधिकारी आहे 'या' मराठी अभिनेत्रीचे पती

मुंबई मध्ये ठिकठिकाणी एनसीबीने धाडी टाकत ड्र्ग्स रॅकेट उघडल्यानंतर काल रात्री Narcotics Control Bureau कडून मुंबई-गोवा क्रुझ वरील एका रेव्ह पार्टीवर देखील धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryaan Khan) चं देखील नाव आहे. एनसीबीने आर्यन खान सह ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

या कारवाई नंतर समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आलं. समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयात झोनल डायरेक्टर आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून NCB वर बदली झाली.

अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सध्या त्यांनी सुरु केलेल्या कारवायाच्या धडाक्यामुळं समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत.

बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत आहे. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. या सर्व कारवायांमागे समीर वानखेडे यांचं दमदार नेतृत्व आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या अनेक मित्रांची चौकशी केली आहे.

समीर वानखेडे हे मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचे क्रांती रेडकरचे पती आहेत. २०१७ मध्ये समीर आणि क्रांती रेडकर यांनी लग्न केले. त्यावेळी क्रांतीने गुपचूप लग्न उरकले होते.

त्यांच्या लग्नसोहळ्याला काही खास मंडळींनीच उपस्थिती लावली होती. आता त्यांना जुळी मुले आहेत. क्रांतीने २००३ मध्ये ‘गंगाजल’ चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Related Stories

No stories found.