KK Death: गायक केके यांच्या ओठांवर, चेहऱ्यावर जखमा... पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद

KK Death: गायक केके यांच्या ओठांवर, चेहऱ्यावर जखमा... पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद

कोलकाता (Kolkata)

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के (singer KK) यांचे मंगळवार, ३१ मे रोजी निधन झाले. कोलकाता (Kolkata) येथे लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी के के यांनी अखेरचा श्वास घेतला.

मात्र या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची (unnatural death) नोंद केल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.. न्यू मार्केट पोलीस स्थानकामध्ये (New Market police Station) केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

आता पोलीस त्यादृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. मात्र, केके यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. केके यांच्या कुटुंबीयांची अनुमती मिळाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येईल. त्यासाठी एसएसकेएम रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com