Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू...

Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू...

अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) 'कौन बनेगा करोड़पति' च्या 13 व्या सीजनचे (Kaun Banega Crorepati 13) होस्‍ट करत आहे. विशेष म्हणजे या रियलिटी शोचा 1000 भाग नुकताच शूट करण्यात आला. ‘सोने पर सुहागा...’ नावाच्या या 1000 व्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर अमिताभ यांची मुलगी श्‍वेता नंदा (Shweta Nanda) आणि नात नव्‍या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) होती. या एपिसोडची शूटिंग करतांना अमिताभ बच्‍चन भावूक झाले. 21 वर्षाच्या प्रवासाची आठवण करतांना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या 1000 वा भागात बिग बींची लेक श्वेता आणि नात नव्या यांनी जे केले ते पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू येत आहे.

पत्नी जयाने केली तक्रार...

सोनी टीव्हीने या भागाचा प्रोमो नुकताच जारी केला. त्यात नव्या तिच्या आजोबांची तक्रार करताना दिसत आहे. तर, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जया बच्चन यासुद्धा या संवादात सहभागी होताना दिसत आहेत.

जया बच्चन म्हणतात, ‘यांना कितीही फोन लावा, ते उचलतच नाहीत... ’अशी तक्रार करतात. तेव्हा बीग त्वरीत म्हणतात, इंटरनेट गडबडतं, त्याला मी काय करु, वडील त्यांची बाजू मांडत असतानाच श्वेता आईची बाजू घेत, श्वेता अगदी खोडकरपणे वडीलांच्या विरोधात जाते. ती म्हणते, हे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात, ट्विट करतात आणि म्हणतात इंटरनेट गडबडलंय म्हणतात. हे सांगितल्यानंतर बिग बींच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे दिसत आहेत.

Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू...
अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष
Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू...
गुगलपासून ट्विटरपर्यंत जगभरातील कंपन्यांचे हे आहेत भारतीय वंशाचे सीईओ

'...लेकिन खेल अभी खत्‍म नहीं हुआ है'

अमिताभ बच्‍चन फ्लॅशबॅक व्हिडिओत भावूक झालेले दिसतात. स्वत: सांभाळत ते म्हणतात, 'लेकिन खेल अभी खत्‍म नहीं हुआ है।' अमिताभ यांनी आपल्या ब्‍लॉगवर या एपिसोडसंदर्भात लिहिले आहे. ते म्हणतात, 1000 व्या भागात माझ्या कुटुंबातील व्यक्तीला हॉटसीटवर बसू देण्याची विनंती मी निर्मात्यांना केली होती. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com