कतरिना कैफचा "फोन भूत" चित्रपट 2021 मध्ये चित्रपटगृहात
मनोरंजन

कतरिना कैफचा "फोन भूत" चित्रपट 2021 मध्ये चित्रपटगृहात

या हॉरर कॉमेडी चित्रपटात कतरिना सोबत सिद्धांत चतुर्वेदी व ईशान खट्टर दिसणार

Nilesh Jadhav

अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट "फोन भूत" मध्ये दिसणार आहे.

काही दिवसापूर्वी या तिघांनी एक फोटोशूट केले आहे. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅटरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी तिघेही उडी मारताना आणि पोज देताना दिसत आहेत.

सिद्धांतने आपल्या ट्विटरवरून व्हिडिओ अपलोड करत या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हंटले आहे, "भुताच्या जगामध्ये तिघांचा त्रास ! घाबरायला परवानगी आहे, जो पर्यंत तुम्ही हसत आहात. फोन भूत चित्रपट 2021 मध्ये चित्रपटगृहात" अशी माहिती त्याने दिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग करत आहे. तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या चित्रपटाचे निर्माता आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com