Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनकंगनाच्या 'ट्वीट'मुळे खळबळ, गांधी-नेहरुंवर केली टीका

कंगनाच्या ‘ट्वीट’मुळे खळबळ, गांधी-नेहरुंवर केली टीका

मुंबई | Mumbai

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या आपल्या ट्विटमुळे चर्चेत आहे. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तिने एक ट्विट केले आहे. वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त कंगनाने त्यांना अभिवादन केले. याच बरोबर तिने, आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हंटली आहे कंगना ?

कंगनाने म्हंटले आहे की, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती निमित्ताने शुभेच्छा, भारताचे लोहपुरुष सरदार पटेल तुम्ही अशी व्यक्ती होतात, ज्यांनी आम्हाला आजचा अखंड भारत दिला. महात्मा गांधी यांनी खूश करण्यासाठी आपण पंतप्रधान पदाचा त्याग केला. महात्मा गांधी यांना असं वाटत होतं की, नेहरू हे उत्कृष्ट इंग्रजी बोलतात. त्यामुळे महात्मा गांधीच्या निर्णयामुळे केवळ सरदार पटेल यांनाच नाही तर संपूर्ण देशाला अनेक दशकांपर्यत नुकसान सहन करावं लागलं. आपण आपले महान नेतृत्त्व आणि दृष्टी आमच्यापासून दूर नेली. आपल्या निर्णयाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

तसेच “ते भारताचे खरे लोहपुरुष आहेत. गांधीजींना नेहरूंप्रमाणे एक कमकुवत बुद्धी असलेली व्यक्ती हवी होती. जेणेकरून त्यांना त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवता येईल आणि नेहरूंना समोर करून निर्णय घेता येतील. ही एक चांगली योजना होती. मात्र, गांधीजी गेल्यानंतर जे झाले ती मोठी आपत्ती होती.”

“त्यांनी गांधींना खूश करण्यासाठी भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या स्वरुपात, आपल्या सर्वात योग्य आणि निवडलेल्या पदाचे बलिदान दिले. कारण नेहरू चांगले इंग्रजी बोलतात, असे गांधींना वाटत होते. यामुळे सरदार पटेलांना नाही, तर संपूर्ण देशालाच अनेक दशके नुकसान सोसावे लागले. ज्यावर आपला अधिकार आहे, ते आपण कसल्याही प्रकारची लाज न बाळगता घ्यायला हवे.” असे तीने म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या