कंगनाची राज्य सरकारवर पुन्हा घणाघाती टीका, म्हणाली...

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले
कंगनाची राज्य सरकारवर पुन्हा घणाघाती टीका, म्हणाली...

मुंबई | Mumbai

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्यावरून राजकीय मंडळीत चांगलेच आरोप-प्रत्योरोप झाले. 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.' असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लगावला. या वादात कंगनाने देखील उडी घेतली आहे. कंगनाने पुन्हा एकदा ट्विट ठाकरे सेनेचा बाबर सेना असा उल्लेख केला आहे.

कंगनाने ट्विट करत म्हटले आहे की, "माननीय राज्यपाल साहेबांनी गुंडा सरकारला प्रश्न वीचारला आहे हे ऐकून छान वाटले. महाराष्ट्रातील गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडायला परवानगी दिली मात्र अगदी सुनियोजितपणे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सोनिया सेना सध्या बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे."

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com