Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनभारतीय संघाच्या खेळाडूंवर कंगनाचं वादग्रस्त ट्विट, म्हणाली..

भारतीय संघाच्या खेळाडूंवर कंगनाचं वादग्रस्त ट्विट, म्हणाली..

दिल्ली l Delhi

कंगना रणौत आपल्या फटकळ स्वभावामुळे चांगलीच ओळखली जाते. मुद्दा कोणताही असो, व्यक्ती कोणीही असो कंगना कोणाबद्दलही आणि कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू शकते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टि्वट केल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

- Advertisement -

यानंतर भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्विट करून आपली मतं नोंदवून, देशाने एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला आहे. आता क्रिकेटर्सने केलेल्या ट्विटवर चर्चा होत आहे. रोहित शर्माने देखील यावर ट्विट केलं आहे. ज्यानंतर कंगना रणौतने या ट्विटला रिट्विट करत क्रिकेटर्सवर निशाना साधला आहे. कंगना रणौतने म्हटलंय की, ‘सगळे क्रिकेटर्स धोबीचे कुत्रे…. न घर का ना घाट का सारखं का वागत आहेत? शेतकरी कायद्याच्या विरोधात का असतील? जो कायदा त्यांच्या चांगल्यासाठीच असेल. हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घालत आहेत. सांगा ना एवढं का भीती वाटते?’. असे तिने म्हंटले आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले होते. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने निशाणा साधला होता. ‘आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही’, अशी टीका तिने केली होती. तसेच कंगनानं शेतकरी आंदोलकांना ‘अतिरेकी’ म्हणत भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं म्हटलं होतं. ट्विटरनं यासंदर्भात आक्षेप घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहेत. ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही लागू केलेल्या पॉलिसीच्या श्रेणीनुसार ट्विटर नियमांचे उल्लंघन करणार्‍या ट्विटवर कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या