Tejas Teaser : भारत को छेडोगे, तो छोडेंगे नहीं! कंगना रनौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज

Tejas Teaser : भारत को छेडोगे, तो छोडेंगे नहीं! कंगना रनौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज

मुंबई | Mumbai

कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या तेजस या चित्रपटामुळे चर्चेत होती. आता तिच्या बहुप्रतीक्षित चित्रपट तेजसचा टीझर रिलीज झाला आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तेजसचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कंगना दमदार स्टाईलमध्ये दिसणार आहे. 8 ऑक्टोबरला कंगनाच्या तेजस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर 27 ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहात दिसणार आहे.

आरएसवीपीच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'तेजस' या सिनेमाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. वैमानिकेची भूमिका कंगनाने चोख बजावली असल्याचा अंदाज टीझरवरुन येत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच कंगना वैमानिकेच्या भूमिकेत दिसत आहे. त्यावेळी बॅकग्राउंडला आवाज येत आहे,"प्रत्येक गोष्ट बोलण्याची गरज नाही. आता आमने-सामने येण्याची वेळ आली आहे. आता आभाळातून पाऊस नव्हे तर आग येण्याची गरज आहे. भारत को छेडोंगे तो छोडेंगे नही".

'तेजस'च्या टीझरमधील कंगनाचा अॅक्शन अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना मध्यवर्ती भूमिकेत आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com