कंगनाला Twitter चा दणका; अकाऊंट सस्पेंड

का केलं अकाऊंट सस्पेंड?
कंगनाला Twitter चा दणका; अकाऊंट सस्पेंड

दिल्ली l Delhi

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पण ती तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या आक्षेपार्ह ट्वीटमुळे चर्चेत आहे. मात्र आता अभिनेत्री कंगणा रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.

पश्चिम बंगाल राज्यात ममता यांच्या पक्षाचा विजय झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारावर संतापलेल्या कंगनाने पुन्हा एकदा ट्वीट करत ममता यांच्यावर निशाणा साधला.

कंगनाने म्हंटल होत की, 'मी चुकीची होते. त्या रावण नाहीत. रावण तर महान राजा होता, त्याने दुनियेतील सगळ्यात जास्त श्रीमंत देश बनवला होता. तो एक महान राजा होता, विद्वान होता, वीणा वाजवणारा परिपूर्ण राजा होता. पण ही तर रक्तासाठी आसुसलेली ताडका राक्षसी आहे. ज्या लोकांनी त्यांना मत दिली त्यांचे हात देखील रक्ताने माखलेले आहेत.' अशा शब्दात तिने तिचा राग व्यक्त केला. परंतु, तिच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं.

कंगणाचे ट्विटर अकाऊंटर सस्पेंड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वादग्रस्त विधान केल्यामुळे कंगणाचे ट्विटर अकाऊंटर सस्पेंड करण्यात आले होते.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या वेळी अभिनेत्री कंगना रनौत हिने काही ट्विट्स केले होते. त्यामध्ये एनआरसी (NRC), सीएए (CAA) ते रोहिंग्यासह अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. या संबंधितच एका वकिलाने कंगनाच्या विरोधात कोलकाता पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. वकीलने आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, कंगना बंगालमध्ये कायदेव्यवस्था बिघडवू पाहत आहे. तर मुंबईत राहणारी आणि पेशाने सिल्विर स्क्रिन अभिनेत्री आहे. परंतु तिच्या ट्विटरवर बंगाल निवडणूकीबद्दलच अधिक बोलले गेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com