मला इतके मिस करू नका, मी लवकरच तिकडे येणार

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

काल अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे मजिस्ट्रेट कोर्टाने दिले. मजिस्ट्रेट कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या वरून कंगनाने पुन्हा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिने ट्विट करत निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्विट करत म्हंटले आहे, “नवरात्रीचा उपवास कोण कोण करतेय? मीही उपवास करतेय आणि हे फोटो आजच्या पूजेचे आहेत. याचदरम्यान माझ्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. माझ्या मते, महाराष्ट्रात बसलेली पप्पू सेना माझ्यावर भाळली आहे. मला इतके मिस करू नका. मी लवकरच तिकडे येणार आहे.” तसेच तिने या ट्विट सोबत काही फोटो देखील शेअर केले आहे.

काय आहे प्रकरण ?

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *