अभिनेता कमाल आर खानला अटक, मुंबई पोलिसांची 'या' प्रकरणी केली कारवाई

अभिनेता कमाल आर खानला अटक, मुंबई पोलिसांची 'या' प्रकरणी केली कारवाई

मुंबई | Mumbai

चित्रपट समिक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान (Kamal Rashid Khan) याला मालाड पोलिसांनी अटक केली.

2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी (Tweet) त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. केआरकेला बोरिवली कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली.

कमाल हा सोशल मीडियावर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत होता. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमालनं एका प्रसिद्ध व्यक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानं ट्विटच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं. त्यामुळे त्याच्याविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस २ वर्षांपासून कमालचा शोध घेत होती, मात्र कमाल मुंबईत नव्हता. मात्र काल पोलिसांना कमाल मुंबईत येत असल्याचे कळले आणि विमानतळावरूनच त्याला अटक केली गेली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com