Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनकमल हसनच्या 'विक्रम'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; दोन दिवसात कमवले 'इतके' कोटी

कमल हसनच्या ‘विक्रम’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; दोन दिवसात कमवले ‘इतके’ कोटी

मुंबई । Mumbai

लोकेश कानगराज (Lokesh Kanagaraj) दिग्दर्शित ‘विक्रम’ (Vikram) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अर्धशतक ठोकत ५० कोटींची कमाई केली असून दोन दिवसांत वर्ल्डवाईड १०० कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

‘विक्रम’ या चित्रपटात तामिळ अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी सुमारे ४० कोटी (Crore) रुपयांच्या तिकिटांची विक्री (Ticket sales) झाली होती. हा चित्रपट त्याची मूळ भाषा तमिळ व्यतिरिक्त हिंदी आणि तेलगूमध्येही प्रदर्शित झाला आहे.

दुसरीकडे अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ने (Emperor Prithviraj) दोन दिवसांत २३.३० कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच हा चित्रपट पहिल्या दिवशी किमान १४ ते १५ कोटींची कमाई करेल, असे बोलले जात होते. परंतु या चित्रपटाने प्रत्यक्षात मात्र पहिल्या दिवशी (first day) केवळ १०.५० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी १२. ६० कोटींची कमाई केली. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला आहे.

तसेच या वर्षी मार्चमध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchhan Paandey) या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३.२५ कोटींची कमाई केली होती. परंतु त्यानंतर ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट (Movies ) बॉक्स ऑफिसवर (box office) फ्लॉप ठरला होता.

याशिवाय 26/11च्या (26/11 attacks) मुंबई (Mumbai) हल्ल्यात शहिद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या आयुष्यावर निर्माते महेश बाबू (Mahesh Babu) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मेजर’ (Major) या चित्रपटाचा देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला असल्याचे दिसत आहे.

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी ७० लाखांची कमाई केली. तर सर्व भाषेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७ कोटी रुपये कमावले. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५.५० कोटींचा कमाई केली असून दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण १२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या