झी युवा वर पुन्हा जुळून येती रेशीमगाठी

झी युवावर पुन: प्रक्षेपण
जुळून येति रेशीमगाठी
जुळून येति रेशीमगाठी

मुंबई | Mumbai

एखादी व्यक्तिरेखा कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात आणि त्यानंतर थेट त्यांच्या मनात पोहचवते. कलाकार त्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग होत असतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.

ही मालिका सुरू झाल्यापासून ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचं फॅन फॉलॉविंग दिवसेंदिवस वाढत गेलं आणि प्रेक्षकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला. ललित आणि प्राजक्ता सोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेने देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.

हि मालिका आता पुन्हा एकदा पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेची लोकप्रियता पाहता झी युवा वाहिनीने या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणाचा निर्णय घेतला असून हि मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com