Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनदक्षिणात्य सुपरस्टार धनुष 'हॉलीवूड'मध्ये दिसणार

दक्षिणात्य सुपरस्टार धनुष ‘हॉलीवूड’मध्ये दिसणार

दिल्ली । Delhi

दक्षिणात्य सुपरस्टार धनुष आपल्या आगामी कारकिर्दीला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. टॉलिवूड आणि बॉलिवूड गाजवल्यानंतर धनुष हॉलिवूड गाजवण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या पदरात एक नवा हॉलिवूड चित्रपट पडला आहे.

- Advertisement -

धनुष लवकरच एंथोनी आणि जो रुसो यांच्या ‘द ग्रे मैन’ (The Gray Man) मध्ये धनुष दिसणार आहे. ‘द ग्रे मैन’ मध्ये रेयान आणि क्रिस इवांस सारखे दिग्गज अभिनेते दिसणार आङे. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट मार्क ग्रीन यांच्या 2009 मध्ये आलेल्या कांदबरी ‘द ग्रे मैन’ (The Gray Man) वर आधारित आहे. याविषयी नेटफ्लिक्सने ट्वीट करून माहिती दिली आहे.

धनुषचा नवा चित्रपट ‘द ग्रे मॅन’ हा मार्क ग्रिनी (Mark Greaney) यांच्या कादंबरीवर आधारित असून त्याचं बजेट अत्यंत महागडं असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी २०० मिलियन डॉलर अर्थात साधारण १५०० कोटींचं बजेट आहे. या सिनेमाची कथा एका प्रोफेशनल खून्यावर आधारित आहे. तो कधीकाळी सीआयएसाठी काम करायचा. या खून्याची भूमिका रायन गॉसलिंग साकारेल. क्रिस इवांस सीआयए टीममधील सहकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं शूटींग जानेवारीत लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणार आहे. मात्र, अजून धनुषच्या भूमिकेबाबत माहिती मिळू शकली नाही.

वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर धनुष ‘अतरंगी रे’ या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. आनंद एल राय यांच्या या सिनेमात धनुषसोबत अक्षय कुमार आणि सारा अली खानही मुख्य भूमिकेत असतील. या सिनेमाचं शूटींग सुरू झालं असून पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2018 साली आली आलेल्या द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फरीर या इंग्रजी सिनेमात काम केलं आहे. केन स्कॉटनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. आता लवकरच तो द ग्रे मॅन मध्ये झळकणार आहे. याशिवाय तो आनंद एल रायच्या अतरंगी रे या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या