जॅकी श्रॉफ म्हणाला, इंटीमेट सीन शूट करताना खूप लाज वाटली

जॅकी श्रॉफ म्हणाला, इंटीमेट सीन शूट करताना खूप लाज वाटली

जॅकी श्रॉफ(Jackie Shroff) नुकताच एका मुलाखतीत शुटींगसंदर्भातील अनुभव जाहीर केला. जॅकी श्रॉफचा ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ २६/११’ (The Interview: Night of 26/11)हा चित्रपट लवकरच झळकणार आहेत. या सिनेमात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

जॅकी श्रॉफ म्हणाला, इंटीमेट सीन शूट करताना खूप लाज वाटली
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

या चित्रपटात एक किस सीन आहे. याबद्दल सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाला, इंटीमेट सीन शूट करताना खूप लाज वाटली पण जर भूमिकेची गरज आहे तर ते करावं लागतं कारण ते एका अभिनेत्याच्या कामाचा भाग आहे. शुटींग सुरु असतांना अनेक लोक कॅमेऱ्यावर तुमच्याकडे बघत असतात. दिग्दर्शक, सहाय्यक, क्रू आणि त्यानंतर संपूर्ण जग बघत असतं. हे खूप लाजिरवाणं वाटतं पण तुम्हाला ते करावं लागतं कारण ते तुमचे काम आहे. जर भूमिकेला गरज असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल.

जॅकी श्रॉफ हे ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्यामध्ये त्या एका बॉलिवूड स्टारची मुलाखत घेण्यास सांगितलं जातं. हा डच चित्रपट द इंटरव्ह्यूचा रिमेक आहे. परंतु या चित्रपटात 26/11 हे नाव का दिले? हे चित्रपटाच्या टेलरमधून समजत नाही. 26/11 ही भारतीयांसाठी एक मोठी दु:खद घटना आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तीन दिवस पोलिस व दहशतवाद्यांची चकमक सुरु होती. यात शेकडो जणांचे प्राण गेले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com