सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा फॉरेन्सिक रिपोर्ट
मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा फॉरेन्सिक रिपोर्ट

सुशांतच्या नखांच्या नमुन्यांचं परीक्षण आणि स्टमक वॉशचा अहवाल येणे बाकी

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

संपूर्ण चित्रपटसृष्ट्रीत खळबळ माजवणार्‍या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh Rajput) आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे एक महत्त्वाचा पुरावा आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा व्हिसेरा (Vicera) कलिना इथल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून (forensic lab) मधून आता आला आहे. सुशांतच्या मृत्यूमागे (Sushant singh rajput suicide) कुठलाही घातपात किंवा इतर संशयास्पद कारण असण्याची शक्यात त्यामुळे फेटाळली गेली आहे. सुशांतने स्वत:च्या राहत्या घरात छताला लटकून गळफास घेतला, हे या व्हिसेरा रिपोर्टमुळे उघड झालं आहे.

सुशांतच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा अहवालाची पोलीस वाट पाहात होते. ही आत्महत्या आहे आहे की आणखी काही काळंबेरं आहे याची खात्री करण्याच्या दृष्टीने व्हिसेरा रिपोर्ट महत्त्वाचा होता. अजूनही काही महत्त्वाचे मेडिकल ङ्गॉरेन्सिक रिपोर्ट बाकी असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.

सुशांतच्या नखांच्या नमुन्यांचं परीक्षण आणि स्टमक वॉश म्हणजे पोटात नेमकं काय गेलं याचा छडा लावणारा अहवाल अद्याप आलेला नाही.

दुसरीकडे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पोलीस सातत्याने मोठमोठ्या व्यक्तींची चौकशी करीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत कास्टिंग निर्देशक मुकेश छाबडा, यशराज फिल्मचे अध्यक्ष आदित्य चोपडा, वायआरएफचे कास्टिंग निर्देशक शानू शर्मा, फिल्म समीक्षक राजीव मसंदसह अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला समन्स पाठविला होता. कंगनाच्या कायदेविषयक टीमने याचं प्रत्युत्तर दिलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com