
बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा आहे. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यालाही बराच संघर्ष करावा लागला आहे.
हृतिक रोशनने करिअरच्या सुरुवातीपासून आपल्या वडिलांनी दिलेली सगळीच काम मेहनतीने आणि मनापासून पूर्ण केली होती. प्रचंड मेहनती असलेल्या या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नाही तर जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हृतिकने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती त्यावेळी तो त्याच्या सहाव्या बोटामुळे चर्चेत होता. हातांना १० नव्हे तर ११ बोटं असल्यामुळे तो एकेकाळी फार चर्चेत होता. अकरा बोट फार कमी लोकांना असतात. त्यात हृतिकलाही ११ बोटं आहेत.
शाळेत असताना हृतिकचे मित्र दोन अंगठ्यावरून त्याची टिंगल करायचे. त्यामुळे शाळेमध्ये त्याला आपण इतरांपेक्षा वेगळं असल्यासारखं वाटायचं. मित्रांच्या सततच्या चिडवण्यामुळे हृतिक त्या मित्रांपासून लांबच राहायचा. याबद्दल हृतिकने अनेकवेळा मुलाखतीमध्येही सांगितलं आहे.
११ बोटांमुळे हृतिकला फार त्रास सहन करावा लागला होता. एका हाताला सहा बोटं असल्यामुळे शाळेतल्या दिवसांमध्ये त्याला अतिशय वाईट वाटायचं. मोठ्या पडद्यावर त्याने दोन अंगठे असलेला हाथ अनेकवेळा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. एकदा दोन अंगठे असलेल्या हृतिकच्या हातावरील एक अंगठा त्याने कापण्याचा निर्णयही घेतला होता.
अंगठा कापण्याच्या निर्णयावर त्याने वडील राकेश रोशन यांच्याशी चर्चा केली आणि ते हृतिकच्या अंगठ्याच्या ऑपरेशनसाठी तयार झाले. पण हृतिकची आई पिंकी रोशन यांना मात्र हे मान्य नव्हतं.
लहानपणापासून जर या अंगठ्यामुळे हृतिकला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही तर त्यानं हा अंगठा कापणं चुकीचं आहे, असं त्याच्या आईला वाटत होतं. म्हणून हृतिकने आईचं म्हणणं ऐकून ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला.
हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात हृतिकबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असून हे दोघंही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.