नेहा खान चा हॉट अंदाज तुम्ही पाहिलात का?
हिट-चाट

नेहा खान चा हॉट अंदाज तुम्ही पाहिलात का?

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

युवा डान्सिंग क्वीनमध्ये अनेक वेगवेगळे नृत्याविष्कार बघायला मिळत आहेत. सुरुवातील १४ सेलिब्रिटी डान्सर स्पर्धक यात होत्या. आता ९ स्पर्धक राहिल्या आहेत. कार्यक्रमाचे परीक्षण  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य हे आहेत .

फेब्रुवारी  हा हा प्रेमाचा महिना. यामुळे प्रेम रस घेऊन सगळे स्पर्धक त्यांचे निरनिराळे परफॉर्मन्स सादर करत आहेत. शिकारी आणि झी ५ वरील काळे धंदे या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खान ने तिच्या हॉट अंदाजामध्ये प्रेमरस दाखवला.

स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी वर चित्रित झालेलं आणि स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं लाल इश्क या मराठी चित्रपटातील ” चांद मातला, चांद मातला जीव गुंतला, जीव गुंतला” हे अतिशय सुंदर असे प्रेमी युगलांवरील प्रेमगीत नेहा खान हिने अतिशय सुंदरतेने तिच्या हॉट अंदाजामध्ये सादर केले.

या गाण्याची कोरिओग्राफ़ी ओंकार शिंदे याने एवढी उत्तम केलेली की युवा डान्सिंग क्वीन चे दोन्ही जजेस मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी हरवून गेले.

दोघांनाही हा नेहाचा गाण्यामधील अभिनय आणि पूर्ण डान्स परफॉर्मन्स खूपचं भावला. नेहा खान ही आजवर तिच्या हॉट सीन्स मुळेच प्रसिद्ध आहे मात्र त्याबरोबर ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका आहे हे तिने या परफॉर्मन्स मधून दाखवून दिले.

Deshdoot
www.deshdoot.com