अनिता बनली सांता

अनिता बनली सांता

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.  या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांकदेखील  मोडीत काढले आहेत.

नुकतंच सगळ्यांनी नाताळ हा सण साजरा केला. त्यात आपले कलाकार कसे मागे राहतील. माझ्या नवऱ्याची बायको’ या सेटवर देखील हा सण साजरा करण्यात आला आणि राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते हि चक्क सांता बनली.

तिने सांताच्या वेशात तिचा ऑनस्क्रिन मुलगा अथर्व सोबत फोटो काढून तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आणि नाताळच्या शुभेच्छा देखील दिल्या. तिचा हा सांता लुक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com