शाहिद कपूरच्या ‘जर्सी’च्या शूटिंगला सुरवात
हिट-चाट

शाहिद कपूरच्या ‘जर्सी’च्या शूटिंगला सुरवात

Gokul Pawar

Gokul Pawar

चंदीगड : चॉकलेट बॉय शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शाहिद कपूर यासंदर्भात इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे.

दरम्यान कबीर सिंगच्या उत्तुंग यशानंतर जर्सीद्वारे पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटात शाहिद मुख्य भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच शुटिंगला सुरवात झाली होती, परंतु शाहिदची तब्येत बिघडल्याने या चित्रपटाचे शुटींग लांबले होते. परंतु, आता शाहिद सेटवर हजर झाला आहे. ‘जर्सी’ हा चित्रपट तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे.

या चित्रपटामध्ये शाहिद कपूर, पंकज कपूर, मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात पंकज कपूर, शाहिद कपूरच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. याअगोदर २०१५ मध्ये ‘शानदार’ चित्रपटात शाहिद आणि पंकज कपूर एकत्र दिसले होते. तसेच २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मौसम’ चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज कपूर यांनी केले होते.

Deshdoot
www.deshdoot.com