सासूबाईंचं लग्न ठरलं…
हिट-चाट

सासूबाईंचं लग्न ठरलं…

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

प्रेमाला कोणतीही परिसीमा किंवा व्याख्या नसते. त्याचप्रमाणे प्रेमाला वयाची मर्यादा किंवा समाजाची बंधनंही नसतात. असली, तरीही साथीदाराचा विश्वास आणि आपल्या माणसांची साथ या संघर्षालाही काहीशी सुकर करुन जाते. याचीच प्रचिती देणारी एक मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’.

निवेदिता सराफ, गिरिश ओक, तेजश्री प्रधान, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका असलेली मालिका आता एका अतिशय रंजक वळणावर आली आहे.

आजोबा त्यांचं मत बदलून या लग्नासाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या परवानगीनेच आसावरी आणि अभिजीत यांच्या लग्नाची लगबग चालू झाली आहे.

रविवार १९ जानेवारी या दिवशी लग्नाचा मुहूर्त निघाला आहे. सासूबाईंचा हा लग्नसोहळा प्रेक्षकांना १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष भागात पाहायला मिळेल. आजोबा स्वतः असावारीचं कन्यादान करणार असून शुभ्रा ही आपल्या लाडक्या सासूबाईंची करवली होणार आहे.

हा लग्नसोहळा अविस्मरणीय असेल यात शंकाच नाही. अभिजीत आणि आसावरी ही दोन्ही पात्र साकारणाऱ्या निवेदिता सराफ आणि गिरिश ओक या कलाकारांचं सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. शिवाय आता या पुढे ‘सासूबाईं’चा प्रवास कसा असणार याविषयीसुद्धा कुतूहल व्यक्त केलं जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com