जनता कर्फ्युमध्ये सहभागी नागरिकांसाठी ‘झी टॉकीज’ची अनोखी ऑफर
हिट-चाट

जनता कर्फ्युमध्ये सहभागी नागरिकांसाठी ‘झी टॉकीज’ची अनोखी ऑफर

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : जगभरातील नागरिक कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. या स्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सिनेमागृहदेखील बंद करण्यात आली आहेत. उद्या जगभरात जनता कर्फ्यू राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झी टॉकीज प्रेक्षकांसाठी दिवसभर चित्रपटांचा खजिना ठेवणार आहे.

दरम्यान उद्या होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सर्वानी सहभागी होऊन कोरोनाला हद्दपार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. यामुळे जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांसाठी एव्हरग्रीन मराठी चित्रपटांचा खजिना ‘झी टॉकीज’वर असणार आहे. यामध्ये ‘झपाटलेला’, ‘नशीबवान’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘पळवापळवी’ अशा चित्रपटांचा नजराणा पाहावयास मिळणार आहे.

या धमाकेदार दिवसाचा शेवट होईल, तो ‘ट्रिपल सीट’ या सिनेमाने! चॉकलेट हिरो अंकुश चौधरी याची या सिनेमात उडणारी तारांबळ पाहताना भरपूर मनोरंजन होते. कोरोनापासून बचावाकरिता घरी थांबणाऱ्या प्रेक्षकांसाठी, पाडव्याच्या मुहूर्तावर मनोरंजनाचा धमाका ‘झी टॉकीज’ घेऊन येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com