अक्षय कुमारकडून सिनेमागृहे व कर्मचाऱ्यांना मदत
हिट-चाट

अक्षय कुमारकडून सिनेमागृहे व कर्मचाऱ्यांना मदत

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार नुकताच केंद्र आणि राज्यसरकार मदत निधी दिला आहे. आता त्याने सिनेमागृहांच्या देखभालीसाठी निधी दिला आहे.

दरम्यान करोना व्हायरसच्या लढाईत अक्षय कुमारने २५ करोडचा निधी पीएम केअर फंडला मदत म्हणून दिला आहे. या करोना लढाईत जागृतीसाठी विविध व्हिडिओज बनवले आहेत. मनोज देसाई यांच्या गॅलेक्सी सिनेमागृहासाठी मदतीसाठी हात पुढे केला आहे.तसेच मुंबईतील अनेक चित्रपट गृहाच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

सिनेमा गृहातील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास मालक असमर्थ आहेत. त्यामुळे करोना व्हायरसच्या या लढाईत सर्व बॉलिवूड स्टार्स मनापासून मदत करत आहेत.

अक्षय कुमार यांनी लोकांना जागरूक करण्याचे काम केले आहे. शिवाय त्यांनी मुंबई पोलिसांना धन्यवाद म्हटले आहे. याचा त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अक्षय कुमार यांनी पोलीस, नर्स” डॉक्टर्स, व्हॉलिंटिअर्स आणि गार्ड यांना धन्यवाद म्हटले आहे.

सलिल परांजपें देशदूत नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com