विक्रम गोखले व अमिताभ बच्चन यांचा एबीसीडी चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार
हिट-चाट

विक्रम गोखले व अमिताभ बच्चन यांचा एबीसीडी चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर एबीसीडी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान १३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण कोव्हीड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत.

संपूर्ण जग, आपला भारत आणि महाराष्ट्र अगदी धैर्याने कोव्हीड १९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. यात डॉक्टर्स, नर्स, सरकारी कर्मचारी आणि सफाई कामगार महत्वाची भूमिका बजावत आहेत. ते एकप्रकारचे योद्धेचं आहेत. या कोरोना व्हायरसच्या योध्यांना हा चित्रपट समर्पित करण्यात आला आहे.

या चित्रपटात विक्रम गोखले, अमिताभ बच्चन, नीना कुलकर्णी, लोकेश गुप्ते, सुबोध भावे, सीमा देशमुख, शर्वरी लोहोकरे, सागर तळाशीकर, सायली संजीव, आणि अक्षय टंकसाळे, साक्षी सतीश यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन हे पाहुण्या कलाकाराच्या महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.
एबी (अमिताभ बच्चन ) आणि सीडी (चंद्रकांत देशपांडे) म्हणजेच विक्रम गोखले यांच्या सहा दशकापासूनच्या मैत्रीवर आधारित हा चित्रपट आहे.

सदर चितपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले असून, कथा हेमंत एदलाबादकर यांची आहे. चित्रपटाचे संगीत आशिष मुजुमदार आणि मयुरेश पै यांचे असून, संकलन मयूर हरदास यांचे आहे.

चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, भ्यानंद सिंग, अरविंद रेड्डी, कृष्णा परसोड आणि पियुष सिंग यांचे आहे. तसेच प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि केव्ही रेड्डी प्रोडक्शन या निर्मिती संस्था आहेत.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com