एमएक्स प्लेयरवरील ‘या’ मराठी वेब सिरीज लवकरच झी मराठीवर
हिट-चाट

एमएक्स प्लेयरवरील ‘या’ मराठी वेब सिरीज लवकरच झी मराठीवर

Gokul Pawar

मुंबई : झी मराठी वाहिनीवर येत्या २७ एप्रिल ते २ मे २०२० या काळात आणि काय हवं, पांडू आणि वन्स अ इयर या तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

लॉकडाऊन काळात घरी असणाऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा या तीन मालिकांचा मुख्य उद्देश आहे. ‘आणि काय हवं’ नात्यातील गोडवा वाढवणारी एक कथा आहे. ही मालिका रात्री ९ वाजता झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका असणार आहेत.

पांडू ही मालिका म्हणजे पोलिसाच्या वर्दीतील एक पात्र आहे. ही मालिका ९:३० वाजता दाखवण्यात येणार आहे. वन्स अ ईयर रवी आणि आर्यन अशी प्रमुख पात्रांची नावे आहेत. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com