७ फेब्रुवारीला मलंग चित्रपट रिलीज होणार
हिट-चाट

७ फेब्रुवारीला मलंग चित्रपट रिलीज होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : यशराज फिल्म्सने आतापर्यंत दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चक दे इंडिया यासारखे सुपरहिट चित्रपट बनवून रसिकांच्या मनात अधिराज्य केले आहे. आता येत्या ७ फेब्रुवारीपासून यशराज फिल्म्सचा आणखी एक सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मलंग असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटात दिशा पाटणी , अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. टी सिरीज या चित्रपटाची प्रोडक्शन कंपनी आहे.

चित्रपटाची निर्मिती नवरंजन, भूषण कुमार, किशन कुमार आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मोहित सूरी दिग्दर्शित हा तिसरा चित्रपट आहे. त्यांनी या आधी आशिकी २, एक विलन या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दिशा पाटणी आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अनुपम रॉय, अंकित तिवारी, जीत गांगुली आणि मिथुन यांनी केले आहे. चित्रपटाची कथा असीम अरोरा यांची आहे. पटकथा अनिरुद्ध गुहा यांनी लेखन केली आहे. छायांकन विकास शिवरामन यांचे आहे.

चल घर चले या गाण्याचे बोल सय्यद क्वाड्री यांचे आहेत. हे गाणे अर्जितसिंग यांनी गायले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण १६ मार्च २०१९ रोजी सुरु झाले होते. छायाचित्रण २२ मार्च रोजी गोव्यात सुरु झाले होते. हा चित्रपट रोमॅन्स, ऍक्शन आणि थ्रिलर अशा तिन्ही गोष्टींनी भरलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ६ जानेवारी रोजी लाँच करण्यात आला होता. खरे तर हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२२० रोजी प्रदर्शित होणार होता मात्र २६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com