हव्वा कुणाची रं! थेटरात उडालाय ‘धुरळा’
हिट-चाट

हव्वा कुणाची रं! थेटरात उडालाय ‘धुरळा’

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : बहुचर्चित धुरळा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या सिनेमची धुरळा सुरवात झाली असून महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.

दरम्यान समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’ हा राजकीय कथानकावर आधारित असून २०२०च्या सुरवातीचा पहिला मराठी चित्रपट आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अलका कुबल, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, प्रसाद ओक, हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

धुरळा चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत होता. त्यांमुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. आज हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकही सिनेमागृहात धुरळा उडवीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com