Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा

Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यू झुंज देत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीविषयी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांनी पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अजित सक्सेना यांनी मीडियाला सांगितले की, राजू भैय्या यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्याचे हात पाय किंचित हालचाल करू लागले आहेत. एवढेच नाही, तर राजू यांनी डोळे उघडले आणि पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याकडे पाहिले. त्यांनी पत्नीच्या हाताला स्पर्श केला आणि आपण लवकर बरे होऊ, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

१० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव हॉटेलमधील जीममध्ये वर्कआऊट करत होते. ट्रेडमिल एक्सरसाइज करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही राजकीय नेत्यांची भेट घेण्यासाठी राजू हे दिल्लीत थांबले होते. पण सकाळी वर्कआऊट करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सर्वजण ते लवकरात लवकर ठिक व्हावेत यासाठी प्रार्थना करत होते. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com