Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनहरभजन सिंगच्या बहुचर्चित 'फ्रेंडशिप'चा टीझर प्रदर्शित, पाहा टीझर

हरभजन सिंगच्या बहुचर्चित ‘फ्रेंडशिप’चा टीझर प्रदर्शित, पाहा टीझर

दिल्ली Delhi

अनेक खेळाडूंनी कारकिर्दीनंतर राजकारण, अभिनय, व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ला आजमावून पाहिले आहे.

- Advertisement -

यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचाही समावेश झाला आहे. हरभजन सिंगच्या आगामी फ्रेंडशिप चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे.

हरभजन सिंग ‘फ्रेंडशिप’ या तमिळ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा टीझर सोशल मीडियावर शेअर करताना हरभजननं लिहिलं, ‘शार्प, क्रिस्प, इन्टेन्स, माझा चित्रपट ‘फ्रेंडशिप’चा हा ट्रेलर, एन्जॉय करा.’

या टीझरमधून हरभजनची विविध रुपं चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. तो या ट्रेलरमध्ये डान्स करताना दिसला आहे. तसेच दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसतानाही दिसत आहे. याबरोबरच तो मारामारी करतानाही दिसत आहे. तसेच मारामारी केल्यानंतर त्याला पोलिसांनी तुरुंगात टाकल्याचेही दिसले आहे. एवढेच नाही तर तो ट्रेलरच्या शेवटी क्रिकेट खेळतानाही दिसला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि व्हीएस लक्ष्मणनं सुद्धा त्याचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी या चित्रपटासाठी शुभच्छाही दिल्या आहेत.

‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनामुळे चित्रपट रिलीज करता आला नव्हता. आता अशी चर्चा आहे की या वर्षाच्या अखेरीसपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हरभजन यापूर्वी बर्‍याचदा चित्रपटांमध्ये दिसला आहे. सलमान खान, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारचा चित्रपट मुझसे शादी करोगी या चित्रपटात दिसला होता. यानंतर तो पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या