Friday, May 10, 2024
HomeमनोरंजनSalman Khan: सापाने मला पहिलं बर्थडे गिफ्ट दिलं; सलमानची प्रतिक्रिया

Salman Khan: सापाने मला पहिलं बर्थडे गिफ्ट दिलं; सलमानची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

आज अभिनेता सलमान खानचा वाढदिवस (salman khan birtday) आहे. रात्री उशिरा त्यांने पनवेल (panvel) येथील त्यांच्या फार्म हाऊसवर (farmhouse) वाढदिवस साजरा केला. रविवारी सलमान खानला साप चावला (snake bite) होता, त्यानंतर यावेळेस तो वाढदिवस साजरा करणार नाही अशी प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र त्याची प्रकृती सुधारत आहे. त्यानंतर रात्री सलमानने आपला वाढदिवस कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत साजरा केला. (salman khan news)

- Advertisement -

दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सलमान खानने (salman khan latest news) माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी सलमान खानने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. सलमान म्हणाल की, ‘माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता, मी काठीने त्याला बाहेर काढले. हळूहळू तो माझ्या हाताजवळ आला. मी त्याची सुटका करण्यासाठी त्याला पकडलं, त्यावेळी त्याने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मला ६ तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मी आता ठीक आहे.’ तसेच सापाने मला पहिलं बर्थडे गिफ्ट दिलं, असंही तो गंमतीत म्हणाला. (salman khan snake)

नेमकं काय घडलं?

२५ डिसेंबरला ख्रिसमस आणि आज (२७ डिसेंबर) सलमानचा वाढदिवस (happy birthday salman khan) आहे. या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून सलमान फार्म हाऊसवर गेला होता. करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे यावेळी सलमानने आपला वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर जवळच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. आपल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठीच सलमान फार्म हाऊसवर पोहोचला होता. (salman khan bitten by snake)

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल फार्म हाऊसवर मित्रांशी बोलत असताना त्याला त्याच्या हाताला काहीतरी टोचत असल्याचे जाणवले. यानंतर त्याने इकडे-तिकडे नजर फिरवली तेव्हा त्याला साप दिसला. यावेळी साप पाहून स्वत: सलमान खान प्रचंड घाबरला आणि त्याने लागलीच मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांना मुंबईतील कामोठे येथील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर काही तासांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. (salman khan news today)

- Advertisment -

ताज्या बातम्या