बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा सुपरस्टार गोविंदाने आज वयाची 57 वर्ष पूर्ण केली आहेत. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 मध्ये मुंबईत झाला. एकेकाळी

मुंबईतील पंचतारांकित ताज हॉटेलने त्यांना त्यावेळी इंग्रजी बोलता येत नसल्याने नोकरी देण्यास नकार दिला होता. पण त्यानंतर विरारमधील या मुलाने गरिबीतून वर येऊन बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. 80 आणि 90 चे दशक त्यांनी गाजवले. या अभिनेत्याचा आज (21 डिसेंबर) वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या अभिनेत्याच्या आयुष्याचा प्रवास.

गोविंदाने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तो काळ अँक्शन आणि रोमान्सचा होता. त्याकाळी सिनेमात हीरो विनोदी भूमिकेत झळकत नव्हते. मात्र हेच आव्हान गोविंदाने पेलले आणि आपल्या कॉमेडी सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

आजसुध्दा त्याचे लाखो चाहते आहेत. तसं तर त्याला सर्वजण गोविंदा या नावाने ओळखतो, त्या पुर्ण नाव गोविंद अरुण अहूजा आहे.

त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा कोणत्याही चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नसल्यानेच त्याला नाट्यमय असे म्हटले. विनोदाचे कमालीचे टायमिंग, जबरदस्त डान्स, तुफानी एक्शन आणि रंगीबेरंगी कपडे ही गोविंदांची ओळख होती. त्यावेळी गोविंदा यांनी जे केले ते शाहरूख खानही करू शकला नसता आणि आंमीर खानही. त्यांच्या वेगळ्या स्टाइलपुढे सलमानची बॉडी आणि अक्षय कुमारची एक्शनही फिके पडत होते. बॉलीवूडमध्ये 80 आणि 90 च्या दशकात चित्रपट केवळ गोविंदा यांच्या नावावर चालत होते. पण हे स्थान मिळविण्यासाठी गोविंदा यांना तितकाच संघर्षही करावा लागला.

21 डिसेंबर 1963 मध्ये त्यांचा जन्म झाला. गोविंदा यांचे वडील अरुण कुमार अहूजा त्यांच्या काळातील प्रसिद्ध कलाकार होते. 30-40 चित्रपटांतून त्यांनी भूमिकाही केल्या. तर गोविंदा यांची आई निर्मलादेवी या शास्त्रीय गायिका होत्या. एका फिल्मच्या निर्मितीमध्ये गोविंदांच्या वडिलांना मोठे नुकसान सहन करावे लागले त्यामुळे त्यांना आपला बंगला सोडून मुंबईच्या विरार भागात येऊन रहावे लागले. गोविंदा कॉमर्समधील पदवीधर आहेत. नोकरीसाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ताज हॉटेलने त्यांना नोकरी देण्यास नकार दिला होता.

एकदिवस त्यांच्या आईला कुठेतरी जायचे असल्याने ते खार स्टेशनवर त्यांच्याबरोबर लोकलची वाट पाहात होते. खचाखच भरून येणार्या अनेक लोकल त्यांनी सोडून दिल्या. पण आईला झालेल्या या त्रासामुळे चिडलेल्या गोविंदा यांनी त्यांच्या आईसाठी फर्स्टक्लासचा पास बनवून दिला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून काही पैसे उसने घेतले होते. या गोष्टीमुळे ते खूप अस्वस्थ झाले. 80 च्या दशकापूर्वी एलविन नावाच्या कंपनीच्या जाहिरातीत त्यांनी काम केले आणि त्यांची अभिनयाची गाडी रुळावरून वेगात धावू लागली. 1986 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट इल्जाम प्रदर्शित झाला आणि बॉलीवूडमध्ये त्यांची जादू चालली. त्यांनंतर अनेक हिट चित्रपट देणार्या गोविंदा यांनी आतापर्यंत सुमारे 165 चित्रपटांतून भूमिका केल्या. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणल्या जाणारा गोविंदा सिनेसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला आहे.

त्यांना 11 वेळा फिल्मफेअरचे नामांकनही मिळाले. बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला, तर, चार वेळा झी सिने अवॉर्ड मिळाले. अशा या प्रसिध्द अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.