Happy Birtday Radhika Apte : राधिका साडीतही दिसते तितकीच सुंदर! पाहा फोटो

Happy Birtday Radhika Apte : राधिका साडीतही दिसते तितकीच सुंदर! पाहा फोटो

राधिका तिचा अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे.

Netflix Queen राधिका आपटे हिचा आज वाढदिवस. तिचा जन्म पुण्यात ७ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. राधिका तिचा अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे.Radhika Apte Birthday

तिने हिंदी, मल्याळम, तेलगू, तामिळ, बंगाली, मराठी आणि इंग्रजी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधिकाने आपल्या कारकिर्दीची सुरवात महेश मांजरेकर यांच्या वाह लाइफ हो तो ऐसी! या चित्रपटाद्वारे केली.

राधिकाने २००९ मध्ये बंगाली चित्रपट ‘अंतहीन’ मध्ये डेब्यू केला होता. राधिका हिंदी चित्रपट ‘बदलापूर’ आणि ‘मांझी - द माउंटन मॅन’ या हिंदी चित्रपटापासून प्रकाश झोतात आली.

त्यानंतर तिने फोबिया, पार्च्ड, अंधाधुन , पॅडमॅन आणि शोर इन द सिटी सारख्या अनेक चित्रपट केले. तिने मराठी चित्रपट 'लई भारी' मध्ये देखील काम केले आहे.

सध्या ती Netflix Queen म्हणून तिला ओळखले जाते. तिने आतापर्यंत Netflix वर अनेक धडाकेबाज सिरीज मध्ये काम केले आहे. या मध्ये सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज आणि घोल या सिरीजचा समावेश आहे. तिने काम केलेले अनेक चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरले आहे

राधिकाने २०१२ मध्ये शिप ऑफ थिसस, दॅट गर्ल इन यलो बूट्स आणि द ब्राइट डे सारख्या चित्रपटांसाठी संगीत दिलेल्या संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com