Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजन'घुमर' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

‘घुमर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दसवी चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) पुन्हा एकदा नवीन चित्रपट (Movie) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे…

- Advertisement -

घुमर (Ghoomer) असे त्याच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि संयमी खेर (Saiyami Kher) प्रमुख भूमिकेत असणार आहेत. विशेष म्हणजे दोघेही प्रथमच एकत्र काम करणार आहेत.

संयमीने सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा एक रोमँटिक सिनेमा असणार आहे. या चित्रपटात संयमी एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की करणार आहे .

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या