कंगनाविरोधात एफआयआर दाखल

शेतकर्‍यांना उद्देशून आक्षेपार्ह ट्वीट
कंगनाविरोधात एफआयआर दाखल

नवी दिल्ली -

कृषी कायद्यांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना उद्देशून आक्षेपार्ह ट्वीट करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात

कर्नाटक पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी केली आहे.

कृषी विषयक विधेयकांवरून काही शेतकर्‍यांनी केंद्र सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला ट्विटच्या माध्यमातून कंगनाने आपला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयानं क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

काय म्हणाली होती कंगना?

‘कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे. सीएएमुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले.’ अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणार्‍यांवर निशाणा साधला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com