Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअखेर 'तांडव' सीरिजच्या निर्मात्याने मागितली माफी

अखेर ‘तांडव’ सीरिजच्या निर्मात्याने मागितली माफी

दिल्ली | Delhi

देशभरामध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ‘तांडव’ या वेब सिरीजवरून मोठा गदारोळ झाला. यामध्ये हिंदू देवी-देवतांवर केलेल्या टिप्पणीप्रकरणी निर्मार्ते, कलाकार, तसेच लेखकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आता वेब सिरीजच्या निर्मात्यांनी माफी मागितली आहे.

- Advertisement -

सीरिजचे निर्माते अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘तांडव ही वेब सिरिज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही लक्षात घेत आहोत. या वेब सिरिजमधील एका सीनमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता आम्ही या तक्रारी गांभीर्याने घेत आहोत. तांडव ही वेब सिरिज पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवण्यात आलेल्या घटना पूर्णता काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, जाती समुह त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरिही ज्या लोकांच्या या वेब सिरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो’, असे ट्विट तांडवचे निर्माते अली अब्बास झफार यांनी केले आहे.

वेब सीरिजबाबत कोणता वाद आहे?

रविवारी रात्री पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, वेब सीरिजच्या पहिल्या भागामध्ये हिंदू देवतांची चुकीची माहिती दिली गेली होती, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यामध्ये अप्रिय भाषा देखील वापरली गेली आहे, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी निर्माता-दिग्दर्शक, लेखक आणि वेबसीरिजमधील इतरांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

दरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानेही ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवण्याशी संबंधित तक्रारींची दखल घेतली असून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरून या विषयावर स्पष्टीकरण मागितले आहे. वेब मालिकेत कोण कोण आहे अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अयूब, गौहर खान आणि कृतिका काम्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘तांडव’चा शुक्रवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रीमियर झाला. हिमांशु किशन मेहरा यांच्यासह चित्रपट निर्माता अली अब्बास जफर यांनी या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन राजकारणावर आधारित केले आहे. याची पटकथा गौरव सोलंकी याने लिहिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या