तुझाही 'मुसेवाला' करू; पीएम मोदी चित्रपट निर्मात्याला धमकी

तुझाही 'मुसेवाला' करू; पीएम मोदी चित्रपट निर्मात्याला धमकी

मुंबई | Mumbai

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांची ज्याप्रमाणे हत्या केली, तशीच तुझीही हत्या करणार, अशी धमकी चित्रपट निर्माते संदीप सिंह (Sandip Singh) यांना देण्यात आली. त्यांना फेसबुकवर (Facebook) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे...

याप्रकरणी संदीप सिंह यांनी आंबोली पोलीस ठाण्यामध्ये (Amboli Police Station) गुन्हा दाखल केला आहे. संदीप सिंहला सोमवारी ४ जुलैला ही धमकी मिळाली होती.

तुझाही 'मुसेवाला' करू; पीएम मोदी चित्रपट निर्मात्याला धमकी
Visual Story : 'धर्मवीर'च्या शिरपेचात मानाचा तुरा

संशयितायाने फेसबुक मेसेंजरवर (Facebook Messenger) संदीप यांना धमकीचा संदेश पाठवला. यात 'चिंता मत करना, जिस तरह मूसेवाला को गोली मारी गई है, उस तरह तुझे भी मारा जायेगा, प्रतीक्षा कर और याद रख', असे म्हटले आहे. आंबोली पोलिसांनी (Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तुझाही 'मुसेवाला' करू; पीएम मोदी चित्रपट निर्मात्याला धमकी
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

संदीप सिंह हा सुशांतसिंग राजपूतचा (Sushant singh Rajput) मित्र होता. जून 2020 मध्ये सुशांतच्या निधनानंतर संदीप सिंह चर्चेत आले होते. त्यांनी पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सरबजीत (Sarbjit) सारखे चित्रपट बनवले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com