काय सांगता! अंतराळात होणार चित्रपटाचे शुटींग

काय आहे चित्रपटाचे नाव आणि कथा?
काय सांगता! अंतराळात होणार चित्रपटाचे शुटींग

दिल्ली | Delhi

चित्रपटासाठी दिग्दर्शक-निर्माते खूपच मेहनत घेत असतात. एखादा सीन किंवा शॉट जोपर्यंत मनाजोगता येत नाही तोपर्यंत त्यांचे प्रयत्न चालू असतात. अशा परिपूर्णतेसाठी जगभरातील अनेक कठीण ठिकाणीही शुटींग केले गेले आहे.

आता मानवी इतिहासात प्रथमच अंतराळात चित्रपटाचे शुटींग (Shooting) होणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल.

रशिया आपल्या सोयूज यानातून चित्रपटाशी संबंधित या पथकाला अंतराळात रवाना केले आहे. कझाकिस्तानातील कॉस्मोड्रोममधून हे पथक रवाना झाले. या अंतराळ मोहिमेत चित्रपटाची अभिनेत्री, दिग्दर्शक आणि दोघांसाठी एक व्यावसायिक अंतराळवीर गाईड पाठवला गेला आहे.

चित्रपटासाठी अंतराळाचे शूटिंग केले जाईल. असे सीन्स असणारा हा जगातील पहिलाच चित्रपट ठरेल. सोयूझ यानातून हे पथक पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाईल. रशियन अभिनेत्री यूलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्‍लिम शिपेंको हे या मोहिमेतून रवाना होत आहेत.

काय आहे चित्रपटाचे नाव आणि कथा?

अंतराळात ज्या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल त्याचे नाव आहे ‘द चॅलेंज’. चित्रपटाची वेगवेगळी दृश्ये येथे चित्रित केली जातील. या चित्रपटात एका महिला डॉक्टरची कथा दाखवली जाईल, जी अंतराळवीराला वाचवण्यासाठी ISS मध्ये जाते. रशियाची अंतराळ संस्था रोसकोस्मोसने या कथेबद्दल माहिती दिली.

Related Stories

No stories found.