ए.आर.रहमान यांचा खळबळजनक खुलासा
मनोरंजन

ए.आर.रहमान यांचा खळबळजनक खुलासा

काम कमी का झाले, त्याचे सांगितले कारण

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

"बॉलिवूड'मधील bollywood एक गट माझ्याविरूद्ध काम करत आहे, त्यामुळे मला काम मिळण्यास अडचण येत आहेत." असा धक्कादायक खुलासा प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान A.R. Rahman यांनी एका मुलाखतीत केला आहे.

सुशांतसिंगच्या Sushant Singh Rajput आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील bollywood अनेक गोष्टीवर चर्चेला सुरुवात झाली. अनेक कलाकार एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. त्यातच संगीतकार ए.आर. रहमान A.R. Rahman यांनी हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

तसेच ए.आर.रेहमान A.R. Rahman पुढे बोलताना म्हणाले, " मी चांगल्या चित्रपटांना नाही म्हणत नाही, बॉलिवूडमध्येbollywood एक गट आहे जो माझ्याविरुद्ध अफवा पसरवत आहे. जेव्हा दिल बेचारा Dil Bechara चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबडा Mukesh Chhabra माझा जवळ आले तेव्हा दिल बेचारा साठी तेव्हा त्यांना दोन दिवसात चार गाणे दिलेत. तेव्हा ते मला म्हंटले की, काही लोक मला म्हंटले की तुमच्या जवळ जाऊ नको. तुमच्या बद्दल काही गोष्टी देखील सांगितल्या." तसेच " मी नशिबावर विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की सगळे देवाकडून येते. यासाठी मी चित्रपट आणि बाकीचे कामे करत आहे. पण मी सगळ्यांचं स्वागतच करतो, आपण चांगला चित्रपट बनवत असाल तर माझ्याकडे आपले स्वागत आहे."

सोशल मीडियावर देखील अनेक नेटकरी ए.आर.रेहमान यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले दिसत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com