Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनDrug Case : चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या घरावर NCB चा छापा

Drug Case : चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या घरावर NCB चा छापा

मुंबई l Mumbai

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक मोठ्या सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. एनसीबीने नुकतीच मोठी कारवाई करत प्रसिद्ध निर्माता फिरोज नाडियाडवाला (Bollywood producer Firoz Nadiadwala) यांच्या घरी धाड टाकून ड्रग्ज जप्त केले आहेत. आता एनसीबी लवकरच निर्मात्यास समन्स पाठवण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, एनसीबी फिरोजच्या घरी पोहोचली त्यावेळी ते घरी नव्हते.

- Advertisement -

एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत पाच ड्रग डिलर्सना ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून एनसीबीनं अनेक ड्रग्ज डिलर्सच्या घरी छापे मारून करवाई करण्यास सुरूवात केली. एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये १० ग्रॉम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्स प्रकरणी शनिवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. छापेमारी दरम्यान पाच ड्रग डिलर्सना ताब्यात घेतलं आहे. या ड्रग डिलर्सच्या चौकशीदरम्यान या मोठ्या निर्मात्याचं नाव समोर आल्याचं म्हटलं जात आहे.

फिरोज नाडियाडवाल यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीसाठी हेराफेरी, फिर हेराफेरी, आवारा पागल दिवाना, मनी वेलकम, फूल अँड फायनल या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला पण अटक केली.

दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोन (Actress Deepika Padukone) हिची ट‌ॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) हिने अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला ड्रग प्रकरणात करिश्माविषयी संशय वाटत आहे. करिश्मा तिच्याकडे असलेली महत्त्वाची माहिती लपवत असल्याची शक्यता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने व्यक्त केली आहे. काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अचानक करिश्माने आपण क्वान या टॅलेंट एजन्सीतील नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती माध्यमांना मिळेल अशी व्यवस्था केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या