मनोरंजन

चित्रपटात डॉक्टरांच्या साकारलेल्या 'या' भूमिका नेहमीच स्मरणात राहतील..

करोनाच्या सद्यपरिस्थितीत डॉक्टर एका योध्या प्रमाणे लढता आहे. आज १ जुलै, राष्ट्रीय डॉक्टर दिवस. बॉलिवुडच्या काही कलाकारांनी डॉक्टरच्या व्यक्तिरेखा साकारून डॉक्टरांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

Nilesh Jadhav

संजय दत्त (मुन्नाभाई एम. बी. बी. एस)
संजय दत्त (मुन्नाभाई एम. बी. बी. एस)

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता संजय दत्त याने मुन्नाभाई एम. बी. बी. एस या चित्रपटात डॉक्टर ची भूमिका साकारली होती. यातील 'जादू की झप्पी' या उपचाराच्या वेगळ्या पद्धतीमुळे चित्रपट हिट झाला होता. संजय दत्त या डॉक्टरच्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता.

अमिताभ बच्चन (मृत्यूदाता)
अमिताभ बच्चन (मृत्यूदाता)

कारकीर्दीतील सर्व ऑपरेशनमध्ये यशस्वी झालेल्या आणि बर्‍याच शस्त्रक्रिया केलेल्या डॉ. राम प्रसाद घायल यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी मृत्यूदाता या चित्रपटात साकारली होती. त्या काळात हा चित्रपट खूप गाजला होता.

करीना कपूर (थ्री इडियट)
करीना कपूर (थ्री इडियट)

करीना कपूरने कारकिर्दीत अनेक चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली आहे. तिचे अनेक चित्रपट गाजले. यामध्ये सलमान खान सोबत "क्योंकि", शाहिद कपूरच्या "उड़ता पंजाब" तसेच अमीर खानच्या "थ्री इडियट" या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला होता.

शाहिद कपूर (कबीर सिंग)
शाहिद कपूर (कबीर सिंग)

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटामुळे शहीद कपूर याने हिंदी चित्रपट जगतात नवीन ओळख निर्माण केली. या चित्रपटात शाहिद कपूर याने एक वेडा प्रेमी, त्यानंतर मेडिकल कॉलेज मधील सर्वात हुशार व्यक्ती आणि त्यानंतर एक मोठा सर्जन अशी भूमिका साकारली.

Deshdoot
www.deshdoot.com