महाराष्ट्र शाहीर : बाबा, हा तुमचाच चित्रपट आहे; दिग्दर्शक केदार शिंदेंची भावनिक पोस्ट

महाराष्ट्र शाहीर : बाबा, हा तुमचाच चित्रपट आहे; दिग्दर्शक केदार शिंदेंची भावनिक पोस्ट

मुंबई | Mumbai

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) सध्या त्याच्या चित्रपटामुळे खूप व्यस्त होते. केदार शिंदे यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटतातून त्यांनी त्यांचे आजोबा 'शाहीर साबळे' (Shahir Sabale) यांच्या जीवनपट उलगडला आहे. शाहीरांचा खडतर प्रवास, त्यांची जिद्द, त्यांचे राजकीय कार्य आणि एकूणच संगीत विश्वातील कारकीर्द याचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे.

केदार शिंदे त्यांचे आजोबांच्या खूप जवळ होते हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले असून चित्रपटानिमित्त आणि त्याआधी देखील केदार यांनी शाहीर साबळेंच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. तर सोशल मीडियावर पोस्ट करत आजोबांमुळे ते कसे घडले हे देखील सांगितले आहे.

या पोस्टमध्ये केदार म्हणतात की, 'बाबा.. तुम्ही जे आम्हाला दिलं आहे, तुमचे संस्कार, तुमची परंपरा, कलेप्रती असलेली तुमची निष्ठा, सचोटी, एक कलाकार म्हणून कसं जगायचं ह्याचे धडे.. त्या कशाचीच परतफेड आम्ही कधीच करू शकत नाही.. '

महाराष्ट्र शाहीर : बाबा, हा तुमचाच चित्रपट आहे; दिग्दर्शक केदार शिंदेंची भावनिक पोस्ट
Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

'पण तुम्ही आमच्यासाठी उघडुन दिलेल्या ह्या विशालकाय जलाशयातल्या काही घागरी आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी उपसून काढल्या आहेत.. ह्या गढूळ वातावरणात त्या स्वच्छ पाण्याची चव त्यांना भावेल.. त्यांचा आत्मा शांत होईल.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मनोरंजनाची तहान सुद्धा भागेल..'

महाराष्ट्र शाहीर : बाबा, हा तुमचाच चित्रपट आहे; दिग्दर्शक केदार शिंदेंची भावनिक पोस्ट
भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला

हा चित्रपट आम्ही केलेला नाही.. हा तुमचाच चित्रपट आहे.. तुम्हीच घडवून आणला आहे.. आज पासून हा प्रेक्षकांच्या स्वाधीन होतोय.. तुम्ही ह्या महाराष्ट्राला जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम हा महाराष्ट्र तुम्हाला देईलच ही खात्री आहे आम्हाला..

महाराष्ट्र शाहीर : बाबा, हा तुमचाच चित्रपट आहे; दिग्दर्शक केदार शिंदेंची भावनिक पोस्ट
शिवसेना भवन आणि पक्षनिधी कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल?; जाणून घ्या

दरम्यान, आज 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी खास आहे. या चित्रपटातून महाराष्ट्र शाहीर म्हणजेच शाहीर साबळे तरुण पिढीपर्यंत पोहोचणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com