VIDEO : 'नारी, मनहारी...सुकूमारी'! अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं तुम्ही ऐकलंत का?

VIDEO : 'नारी, मनहारी...सुकूमारी'! अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं तुम्ही ऐकलंत का?

मुंबई l Mumbai

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी गाणं तर कधी विविध विषयांवर ट्विट करत त्या नेहमची चर्चेत असतात. कालच अमृता फडणवीस यांनी 'आओ कुछ तुफानी करते है' असे सुचक ट्विट केले होते.

त्यामुळे, अमृता फडणवीस नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अमृता फडणवीस या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या आरोपांवर काही खुलासा करतील का अशी शंका निर्माण झाली होती. अमृता फडणवीस नेमकं काय करणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. अशात आता त्यांनी आपलं गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातवरणात काही हलके क्षण अनुभवुया असं म्हणत अमृता फडणवीस यांनी हे गाणं लॉन्च केलं आहे.

Manike Mage Hithe गाण्याचे हिंदी वर्जनच अमृता फडणवीस यांनी सादर केले आहे. श्रीलंकन गायिका योहानीने (Yohani) माणिके हिथं हे गाणे गायले होते. हे गाणे मोठ्या प्रमाणात जगात व्हायरल झाले होते. तिच्या या गाण्यामुळे सलमान खानने (Salman Khan) योहानीला हिंदी बिग बॉसमध्ये (Bigg Boss) आमंत्रित केले होते. त्या शोमध्ये योहानीने हे गाणे गायले होते.

तेव्हा योहानीनं ते गाणं आपल्या सोबत म्हणण्याची विनंती केली होती. पण सलमानला ते गाणे म्हणता आले नव्हते. यानंतर काही दिवसांनी राणू मंडलने (Ranu Mandal) या गाण्याची कॉपी केली आणि हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी हे गाणे गायले (Amrita Fadnavis New Song) आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com