हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओवर कारवाई करण्याची मागणी
मनोरंजन

हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओवर कारवाई करण्याची मागणी

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने केली मागणी

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

इंटरनेटवरील प्रसिद्ध हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओवर (Hindustani Bhau's video) कारवाई करण्याची मागणी प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा (Comedian Kunal Kamra) याने केली आहे.

कुणाल कामराने ट्विटर वर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) आणि मुंबई पोलिसांकडे (mumbai police) ही मागणी केली आहे.

कुणाल कामरा याने गृहमंत्री अनिल देशमुख व मुंबई पोलिसांना टॅग करत म्हंटले आहे की," उघडपणे हिंसाचाराला समर्थन देणे हा गुन्हा आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. आणि 'सिस्टम साईड मै' म्हणणे आपल्या राज्यघटनेचा (constitution) अपमान आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com