Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनशाहरुख खानला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'जवान'बाबत दिले महत्वाचे आदेश

शाहरुख खानला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; ‘जवान’बाबत दिले महत्वाचे आदेश

दिल्ली | Delhi

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खानने सर्वांची मनं जिंकली होती. यानंतर याच वर्षात आणखी एक चित्रपट रिलीज करून शाहरुख धमाका करणार आहे. या वर्षाच्या मध्यात त्याचा दुसरा चित्रपट ‘जवान’ यावर्षी रिलीज होणार असं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शाहरुखच्या या चित्रपटाचे काही व्हिडिओ लिक झाले होते. त्यानंतर सोशल मिडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले होते. या प्रकरणानंतर रेड चिलीज एंटरटेनमेंटने दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. आता याप्रकरणी शाहरुखला दिलासा देत न्यायालयाने लीक झालेल्या क्लिप सोशल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

आता एकाच नंबरवरून चालणार चार मोबाईलमध्ये WhatsApp… कसं सुरू करायचं?

पहिल्या क्लिपमध्ये शाहरुख फाइट करताना दिसत होता. तर, दुसरी क्लिप डान्स सीक्वेन्सची होती, ज्यामध्ये शाहरुख खान आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री नयनतारा दिसत होते. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी वेबसाइट्स, केबल टीव्ही प्लॅटफॉर्म, डायरेक्ट टू होम सेवा तसेच ‘जॉन डो’ प्रतिवादींना ‘जवान’च्या कॉपीराइटचे उल्लंघन करण्यापासून रोखले आहे. शाहरुख आणि गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ने खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी हा आदेश दिला.

Hapus Mango : अस्सल ‘हापूस’ आंबा नेमका ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

तसेच न्यायालयाने आपल्या आदेशात यूट्यूब, गुगल, ट्विटर आणि रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘जवान’ चित्रपटाच्या कॉपीराइट असलेल्या कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सांगितलं आहे. न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी अनेक इंटरनेट सेवा प्रदात्यांना चित्रपटाशी संबंधित कंटेंट ब्लॉक करण्यास सांगितलंय.

Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?

दरम्यान या चित्रपटाचे व्हिडीओ लीक झाल्यानंतर ‘जवान’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. पण बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, चित्रपट पुढे ढकलण्यात आलेला नाही आणि तो त्याच्या नियोजित तारखेला म्हणजेच २ जून रोजी प्रदर्शित होईल. यासोबतच चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात येणार आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा प्रोमो मी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या