Jawan : शाहरुखच्या आगामी चित्रपटात दीपिकाचा हटके रोल

Jawan : शाहरुखच्या आगामी चित्रपटात दीपिकाचा हटके रोल

मुंबई | Mumbai

बॉलिवूडमध्ये किंग खान, बादशाह आशा विविध नावांनी लोकप्रिय असलेला अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या आगामी जवान (Jawan) या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या चित्रपटात अभिनेता शाहरुख सोबत अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत असणार आहे...

तर अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) चित्रपटात छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका साकारू शकते. पठाण (Pathan) या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ ला २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Jawan : शाहरुखच्या आगामी चित्रपटात दीपिकाचा हटके रोल
आणखी एक ट्विस्ट; आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच 'नॉट रिचेबल'

शाहरुख खान, नयनतारा व्यतिरिक्त चित्रपटात राणा डग्गुबती, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर मुख्य कलाकार आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन एटली करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याने चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com