रणवीरच्या 'त्या' फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...

रणवीरच्या 'त्या' फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...

मुंबई । Mumbai

अभिनेता (Actor) रणवीर सिंग (Ranveer Singh) हा कायमच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट (Nude photo shoot) केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच रणवीरच्या या न्यूड फोटोशूटवर त्याची पत्नी अभिनेत्री (Actress) दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) प्रतिक्रिया दिली आहे...

रणवीरच्या या न्यूड फोटोशूटबाबत बोलतांना दीपिका म्हणाली की, रणवीरचे हे फोटो पाहून मी खूपच इंप्रेस झाले आहे. मला या फोटोशूटची संकल्पना आवडली होती. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मला ते फोटो आवडले होते, असे तिने सांगितले.

तसेच या फोटोशूटबद्दल रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देतांना म्हटले की, रणवीरचे असे फोटोशूट करण्याबाबत आधीच नियोजन झाले होते. रणवीर सिंगला या शूटबद्दल सर्वकाही स्पष्टपणे माहिती होते. तो ते करण्यास फार उत्सुक होता. रणवीर हा दररोज विविध फॅशनचे कपडे परिधान करत असतो. त्याच्या निवडीबद्दल चाहतेही त्याचे कौतुक करतात. त्यामुळे रणवीरने न्यूड फोटोशूट करणे ही इतकी मोठी बाब नक्कीच नाही. तो नेहमीच नवनवीन गोष्टी करण्यासाठी फारच उत्साही असतो, असेही या व्यक्तीने सांगितले.

दरम्यान, रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ (Paper) नावाच्या अमेरिकी मासिकासाठी (American Magazine) करण्यात आले आहे. तर डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूटवरून त्याचे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत असून यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर व्यक्त होत आहे. याशिवाय बंगाली अभिनेत्री (Bengali Actress) मिमी चक्रवर्तीने (Mimi Chakraborty) रणवीर सिंगऐवजी एखाद्या महिलेने जर असे फोटोशूट केले असते, तर काय केले असते? असा सवाल रणवीरच्या फोटोशूटचे कौतुक करणाऱ्यांना केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com