'दे धक्का २' चे पोस्टर रिलीज; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

'दे धक्का २' चे पोस्टर रिलीज; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

मुंबई । Mumbai

'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय', असे म्हणत २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie industries) धमाल उडवली होती...

आता या चित्रपटाचा दुसरा भाग ५ ऑगस्ट २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे ((Makrand Anaspure) शिवाजी साटम (Shivaji Satam) मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) गौरी इंगवळे (Gauri Ingwal) सक्षम कुलकर्णी ( Saksham Kulkarni) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) ही तगडी स्टारकास्ट जोडी आहे.

१४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का'च्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग यावा अशी इच्छा अनेक वर्ष प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. त्यावर दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी (Directed Mahesh Manjrekar चित्रपट लवकरच येईल असे सांगितले होते. 'दे धक्का २' (De Dhakka) हा चित्रपट खरंतर जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

तसेच 'दे धक्का' (De Dhakka) चित्रपटात असलेले सर्व कलाकार नव्या रुपात 'दे धक्का २' (De Dhakka २) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी दौरा कोल्हापूर ते मुंबई नाही तर कोल्हापूर ते लंडन असा असणार आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur) रांगड्या मातीतील हे कलाकार लंडनला (London) जाऊन काय धम्माल उडवणार हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर (Mahesh Manjrekar & Sudesh Manjrekar) यांनी केले असून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि स्कायलाइन एंटरटेमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com